Railway Staff Push Train Coach In UP: लखनौ-सुलतानपूर-वाराणसी रेल्वे ट्रॅकवर निहालगढजवळ तांत्रिक बिघाडामुळे दुसऱ्या दिवशीही रेल्वे वाहतूक प्रभावित झाली. गुरुवारी संध्याकाळी उशिरा विशेष डबा लखनौच्या दिशेने निघाला होता. निहालगड स्थानकाच्या पहिल्या स्पेशल डब्यात तांत्रिक बिघाड झाला होता. त्यानंतर तेथील उपस्थित लोकांनी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी धक्का देत रेल्वेचा डबा फाटकापासून पुढे नेला. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. लोक या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. या रेल्वेत तांत्रिक बिघाड झाल्याने गुरुवारी बेगमपुरा एक्स्प्रेस आणि सुहेल देव एक्स्प्रेससह सहा अप साइड मालगाड्यांवर काही प्रमाणात परिणाम झाला.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)