Lok Sabha Election 2024 Result: उत्तर प्रदेशातील अमेठी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार किशोरी लाल शर्मा यांनी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) विद्यमान खासदार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा मोठा पराभव केला आहे. इराणी यांनी 2019 मध्ये या जागेवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांचा पराभव केला होता. या पराभवानंतर स्मृती इराणी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

केंद्रीय मंत्री आणि उत्तर प्रदेशच्या अमेठी लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार, स्मृती इराणी म्हणाल्या, 'मी भाजप पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि समर्थकांचे, ज्यांनी मतदारसंघ आणि पक्षाच्या सेवेसाठी अत्यंत समर्पणाने काम केले आहे त्यांचे आभार मानते. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आभारी आहे की, त्यांच्या सरकारने 30 वर्षांची प्रलंबित कामे केवळ 5 वर्षात पूर्ण केली आहेत. जे जिंकले आहेत त्यांचे मी अभिनंदन करते. मी अमेठीच्या लोकांच्या सेवेत काम करत राहीन.' (हेही वाचा: Indian General Election Results 2024: इंडिया आघाडीचे यश म्हणजे राज्यघटना वाचविण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल- राहुल गांधी)

पहा व्हिडिओ- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)