Dog Forced to Drink Beer: एका तरुणीने कुत्र्याला बिअर पाजली आणि याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला. हा व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी त्याची दखल घेतली आणि क्रुएल्टी टू अॅनिमल्स कायद्यांतर्गत मुलीवर गुन्हा दाखल केला. एसपी सिटी सरिता डोबल यांनी सांगितले की, या प्रकरणी फव्वरा चौक चौकीचे प्रभारी विकास पनवार यांनी तक्रार केली आहे. व्हिडिओमध्ये एक तरुणी पाळीव कुत्र्याला जबरदस्तीने बिअर पाजताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत होता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)