Lizard Found in Budweiser Beer Bottle: तेलंगणातील विकाराबादमध्ये बडवायझर बिअरच्या बाटलीत आढळला सरडा, व्हिडीओ व्हायरल (Watch)
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, एक पुरुष बाटली हलवताना दिसत आहे, ज्यामध्ये सरडा दिसत आहे. यानंतर लगेचच दोघांनी तक्रार दाखल केली परंतु वाईन शॉप मालकाने त्याकडे दुर्लक्ष केले.
Lizard Found in Budweiser Beer Bottle: तेलंगणातील विकाराबाद येथे एका धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी दोन व्यक्तींना त्यांनी एका कार्यक्रमासाठी खरेदी केलेल्या बिअरच्या बाटलीत एक मृत सरडा सापडला आहे. वृत्तानुसार, केरेली गावातील लक्ष्मीकांत रेड्डी आणि अनंतय्या या दोघांनी धारूरमधील एका स्थानिक वाईन शॉपमधून 4,000 रुपयांची दारू विकत घेतली होती. त्यावेळी बडवायझर बिअरच्या बाटलीत त्यांना मृत सरडा तरंगताना आढळला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, एक पुरुष बाटली हलवताना दिसत आहे, ज्यामध्ये सरडा दिसत आहे. यानंतर लगेचच दोघांनी तक्रार दाखल केली परंतु वाईन शॉप मालकाने त्याकडे दुर्लक्ष केले. (हेही वाचा: Shocking: ग्राहकांना दिल्या जात होत्या थुंकी मिसळलेल्या रोट्या; किळसवाणा व्हिडिओ व्हायरल, आरोपीला अटक, हॉटेल सील)
बडवायझर बिअरच्या बाटलीत आढळला सरडा-
Remains of a dead lizard were found in a beer bottle after two people from Dharur of Vikarabad district purchased liquor worth Rs 4000 from a local wine shop. pic.twitter.com/DaDmC2tRUH
— The Siasat Daily (@TheSiasatDaily) October 25, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 25, 2024 07:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

