उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे थुंकी मिसळून रोटी बनवणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी तरुण एका ढाब्यावर ग्राहकांना थुंकी मिसळलेल्या रोट्या खायला द्यायचा. या किळसवाण्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस एसपी दिनेश कुमार सिंग यांच्या सूचनेनुसार कारवाई केली गेली. पोलिसांनी या तरुणाला अटक केली असून, ढाबा बंद करवण्यात आला आहे. इर्शाद असे आरोपीचे नाव आहे. बाराबंकी जिल्ह्यातील रामनगर भागातील सुधियामौ शहरातील 'हाफिज जी हॉटेल'मध्ये या थुंकी मिसळलेल्या रोट्या दिल्या जात होत्या. हा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

इर्शादचा तंदूर आणि चपातीवर थुंकत असतानाचा घृणास्पद व्हिडिओ मंगळवारी व्हायरल झाला. त्यानंतर अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासनाने हॉटेल बंद करवले. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी बुधवारी आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. अन्न सुरक्षेच्या तक्रारीवरून जीवघेणा रोग पसरवणे यासह इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या एक-दोन महिन्यांत उत्तर प्रदेशात अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. (हेही वाचा: Shocking: पाणीपुरी बनवण्याचे पीठ पायाने मळून तयार केले; चव वाढवण्यासाठी टॉयलेट क्लीनर हार्पिक आणि युरियाचा वापर, दुकानदारांना अटक)

ग्राहकांना दिल्या जात होत्या थुंकी मिसळलेल्या रोट्या-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)