Chair Base Smashes Moving Car: सध्या सोशल मीडियावर यूएसमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये हायवेवर चालत्या कारच्या विंडस्क्रीनवर खुर्चीचा तुटलेला भाग पडला. यामुळे पुढील विंडस्क्रीन फुटली. मात्र, सुदैवाने मोठा अपघात टळला. काच तुटल्याने त्याचे काही कण गाडीत पडले. प्रवासी लिली ईटनने सांगितलं की, ऑफिसची खुर्ची कुठून आली असेल हे मला माहीत नाही. काहीतरी आमच्या दिशेने उडत असल्याचं आम्हाला दिसलं. ट्विटरवर @SkyNews या अकाउंटवरून या घटनेचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)