Video: गुजरातमधील आनंद येथील एका कुटुंबाला एका भयानक पाहुण्याने घरात प्रवेश करून चकीत केले आहे. खरौवा येथील एका निवासस्थानातील शौचालयात सहा फूट लांबीची मगर घुसल्याने रविवारी सकाळी घरामध्ये खळबळ उडाली. मगरीला पाहण्यासाठी गावकरी मोठ्या संख्येने जमले होते. या सरपटणाऱ्या प्राण्याला वनविभागाने ताब्यात घेतले असून ते सध्या त्याची स्थिती तपासत आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पाहा व्हिडीओ:
Gujarat: 6-ft-long crocodile sneaks into toilet in Anandhttps://t.co/aBzkGtyodv pic.twitter.com/mNZNmvEDYw
— TOI Ahmedabad (@TOIAhmedabad) October 10, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)