मुंबई युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष झीशान सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, काँग्रेसमध्ये अल्पसंख्याकांसोबत जे काही घडत आहे ते दुर्दैवी आहे. काँग्रेस आणि मुंबई युवक काँग्रेसमध्ये प्रचंड प्रमाणावर जातीयवाद आहे. इतका जातीयवाद कोठेही नाही. मुस्लिम असणे हे पाप आहे का? मी मुस्लिम आहे म्हणून मला लक्ष्य केले जात आहे का? काँग्रेसने याचे उत्तर द्यावे, असेही सिद्दीकी यांनी म्हटले आहे. झीशान यांचे वडील आणि राजकीय नेते बाबा सिद्दीकी यांनी अलिकडेच काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर झीशान यांच्यावरही काँग्रेसने कारवाई केली. (हेही वाचा, Eknath Khadse Reply To Raksha Khadse: 'भाऊ भाजपमध्ये या', खासदार सुनबाईंच्या अवाहनावर एकनाथ खडसे काय म्हणाले? घ्या जाणून)

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)