वरळीतील बीबीडी चाळीतील घरात काल सिंलिंडरचा स्फोट झाल्याने आग लागली. त्यामुळे घरातील व्यक्तींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले गेले. त्यामध्ये 4 महिन्याच्या मुलाला वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. याच घटनेवर आता महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी असे म्हटले की, वरळीतील घटना निराशाजनक आहे. तसेच रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे पेडणेकर यांनी माफी मागितली आहे. या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्यांचे निलंबन आणि योग्य ती कारवाई केली जाईल. आम्ही सर्वांना कोरोनाचा नवा वेरियंट ओमिक्रॉन यापासून बचाव करण्यासाठी काळजी घेत असल्याचे ही किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

Tweet:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)