ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची सकाळची पत्रकार परिषद सुरू असताना त्यांच्या घरी साप निघाला. त्यानंतर सगळीकडे खळखळ उडाली होती. सुदैवानं यावेळी कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडलेली नाही. यावर प्रतिक्रीया देताना शिवसेना शिंदे गटाचे नेत भरत गोगावले यांची जीभ घसरली. भरत गोगावले म्हणाले, “संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरामध्ये निघालेला साप त्यांच्या तोंडाला चावायला हवा होता. कारण संजय राऊत खूप बोलतात. अति तिथे माती हे ठरलेलं आहे. माणसाने किती बोलावं यासाठी प्रत्येकाला लिमिट आहे.
सापानं संजय राऊतांना कमी बोलण्याचा इशारा दिला असेल. संजय राऊत चुकीचं बोलू नका असं सांगण्यासाठी साप निघाला असेल.”
पाहा व्हिडिओ -
‘तो साप संजय राऊतांच्या तोंडाला चावायला हवा होता’ भरत गोगावले हे काय बोलले?#SanjayRaut #BharatGogawale #EknathShinde pic.twitter.com/z5sw3V2L7h
— Mumbai Tak (@mumbaitak) July 12, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)