Weather Update: राज्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा(Unseasonal Rain) इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. यामध्ये मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांचा समावेश आहे. विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, वाशिम, बुलढाणा, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांसह मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड आणि परभणी या चार जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला आहे. याशिवाय 12 एप्रिलपर्यंत मध्य महाराष्ट्र(Central Maharashtra), विदर्भ(Vidarbha), मराठवाड्यात(Marathwada) अशीच स्थिती राहणार आहे. विदर्भात यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसंच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील पाच ते सात दिवस तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलीये. (हेही वाचा :Maharashtra Weather Update: 7 ते 10 एप्रिल दरम्यान राज्यात गारपिटीसह पावसाच्या हजेरीची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज )
राज्यात आज वादळी वाऱ्यासह कोसळणार अवकाळी! या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा#MaharashtraRain #maharashtraweather #WeatherUpdate #UnseasonalRain #RainUpdatehttps://t.co/dZF15fkUTc
— Times Now Marathi (@timesnowmarathi) April 9, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)