केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव, फोटो आणि भाजपचे ‘कमळ’ चिन्ह असलेली मतदार स्लिप नागपूर येथील मतदान केंद्राजवळ छापण्यात आल्याचा आरोप नेटिझन्सनी केला आहे. ज्यामुळे वाद निर्माण झाला आहे. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवरुन सोशल मीडिया वापरकर्त्यांनी भारतीय निवडणूक आयोगावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. मतदान केंद्रावर उमेदवाराचे फोट छापण्यात आल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या असून निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. समीक्षकांचा असा युक्तिवाद आहे की मतदार स्लिपवर पक्ष चिन्हाची उपस्थिती संभाव्यतः मतदारांवर प्रभाव टाकू शकते आणि निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेला बाधा आणू शकते. निवडणूक आयोगाने अद्याप या आरोपांना उत्तर दिलेले नाही. (हेही वाचा - Lok Sabha Election 2024: तामिळनाडू मध्ये 102 वर्षाच्या महिलेने Reddiyarchatram मध्ये मतदान केंद्रावर जाऊन बजावला मतदानाचा अधिकार! (Watch Video))

व्हिडिओ

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)