पुणे शहरात मुसळधार पावसामुळे पुण्यातील रस्ते आणि वाहतूक ठप्प झाली होती. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहेत. नेटिझन्सने #punerains वापरून जलमय शहराचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. दरम्यान, पुण्यात मुसळधार पावसात दुचाकी वाचवण्याचा प्रयत्न करतानाचा दोन जणांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दोन व्यक्ती आपली स्कूटर वाहून जाण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र, शहरात मुसळधार पावसानंतर पाण्याचा जोर एवढा होता की, पाण्याच्या प्रवाहासोबत च्यांची स्कुटर ओढली जाताना दिसत आहे.
#punerains पुण्यात मध्यरात्री तुफान पाऊस pic.twitter.com/ZwUx6m9UdP
— News18Lokmat (@News18lokmat) October 18, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)