Weather Forecast: राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस सुरु आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पीकांचे नुकसान होत आहे. अवकाळी पाऊसांसदर्भात हवामान विभागाने अपडेट दिला आहे. विदर्भात आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात हलक्या व मध्यम स्वरुपाच्या पाऊस असणार आहे.  विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह, विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग) पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील पाच दिवस विदर्भातील नागरिकांना कडक उष्णतेपासून आराम मिळणार आहे. पुढील दोन दिवस अकोला, नागपूर, यवतमाळ, वर्धा, वाशिममध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस असणार आहे. हवामानाचा अंदाज वर्तवत विदर्भातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अर्लट दिला आहे. (हेही वाचा- आज पाऊस पडेल का? आयएमडी हवामान अंदाज घ्या जाणून)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)