Sayaji Shinde Join NCP: अनेक बॉलिवूड आणि टॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलेले अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी आज अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी अभिनेत्याचे हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. पक्षप्रवेशाच्या वेळी सयाजी शिंदे म्हणाले की, ते प्रदीर्घ काळापासून सामाजिक कार्य करत आहेत. त्यांनी अजित पवार यांचे कौतुक करताना सांगितले की, त्यांच्या पक्षाची धोरणे आकर्षक आहेत म्हणूनच त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. मी चित्रपटांमध्ये राजकारण्यांची भूमिका साकारली आहे, पण मी अजून राजकारणी झालो नाही. मी करत असलेल्या सामाजिक कार्यामुळे मला असे वाटू लागले की, बाहेर राहण्याऐवजी व्यवस्थेत येऊन काही चांगले कामे करता येतील. त्यामुळेच मला अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसची धोरणे आवडली, असंही सयाजी शिंदे यांनी यावेळी नमूद केलं. सयाजी शिंदे यांना विधानसभेत पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून काम देण्यात येणार आहे, यासंदर्भात अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
दिग्गज अभिनेते सयाजी शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश, पहा व्हिडिओ -
#WATCH | Actor Sayaji Shinde joins NCP in the presence of Maharashtra Deputy CM Ajit Pawar and other senior NCP leaders in Mumbai. pic.twitter.com/u9F2amjJLE
— ANI (@ANI) October 11, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)