पुढील तीन दिवस महाराष्ट्रात (Maharashtra) अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने याबाबतची माहिती दिली आहे. हवामानातील द्रोणीय स्थितीच्या परिणाम स्वरुप कोकण (Konkan) ते छत्तीसगडपर्यंत पावसाची स्थिती निर्माण होत आहे. यामुळे 6 ते 9 मार्च दरम्यान गडगडाटी वादळासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच 7 मार्च रोजी मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पहा ट्विट -
6 Mar:एक द्रोणीय स्थिती trough द. कोकण ते मध्य छत्तीसगड पर्यंत आहे.
त्या प्रभावाखाली 6-9 मार्च काळात महाराष्ट्रात गडगडाटी वादळासह हलका/मध्यम पाऊस पडण्याची शक्यता;
📢📢 6-7 मार्च, गुजरात व मध्य महाराष्ट्रात,
7 मार्चला मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता.
-IMD
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) March 6, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)