रायगडमध्ये आज मुसळधार पावसामुळे शाळा कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र अशा परिस्थितीमध्ये जे विद्यार्थी आज मुंबई विद्यापीठाअंतर्गत झालेल्या परीक्षेला मुकले आहेत त्यांना एक दिलासादायक बातमी आहे. या विद्यार्थ्यांना 22 जुलैला पुन्हा आयोजित केलेल्या परीक्षेमध्ये सहभागी होता येणार आहे. त्यामुळे त्यांचं शैक्षणिक नुकसान टळणार आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी आज परीक्षा दिली आहे त्यांना 22 जुलैच्या परीक्षेत पुन्हा सहभागी होता येणार नाही. IMD Weather Forecast: पुढील 24 तासांत राज्यातील हवामान कसे असेल? जाणून घ्या आयएमडीचा इशारा .

पहा मुंबई विद्यापीठाचं परिपत्रक

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)