Viral Video: सोशल मीडियावर दररोड नव-नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ आपल्याला प्रेरणा देणारे असतात. असाचं एक प्रेरणादायी आणि कौतुकास्पद व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक 80 वर्षांच्या आजी बिनधास्तपणे सायकल चालवताना दिसत आहेत. एका दुचाकीवरील प्रवाशाने या आजींचा व्हिडिओ शूट केला आहे. तसेच त्यांना वय विचारले असता आजींनी आपण 80 वर्षांच्या असल्याचं सांगितलं आहे. @s_borawake या ट्विटर यूजर्सने या आजीचा हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यांनी या व्हिडिओला कॅप्शन देताना म्हटलं आहे की, 'आयुष्यात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नसते पण चेहऱ्यावर मात्र कायमस्वरूपी स्मितहास्य असले पाहिजे. या वाक्यांना साजेस् असं उदाहरण पुण्यातल्या वारजेतील या आजी!'
८० वर्षांची 'तरुणी'
आयुष्यात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नसते पण चेहऱ्यावर मात्र कायमस्वरूपी स्मितहास्य असले पाहिजे. या वाक्यांना साजेस् असं उदाहरण पुण्यातल्या वारजेतील या आजी! #म #मराठी #पुणे pic.twitter.com/Y67s5Y32fX
— Suraj Borawake (@s_borawake) August 13, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)