महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघातर्फे घेण्यात येणाऱ्या 66 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची तारीख आणि ठिकाण निश्चित करण्यात आले आहे. 7 ते 10 नोव्हेंबर या काळात पुणे जिल्ह्यातील वाघोली लोणीकंद जवळ फुलगाव येथे या कुस्त्यांचा थरार रंगणार आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या विजेत्याला महिंद्रा थार ( Mahindra Thar ) जीप, ट्रॅक्टर आणि रोख बक्षीस मिळणार आहे. 7 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस आणि उपाध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होईल. तर स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेमध्ये साधारण 50 हजार प्रेक्षक क्षमता असलेले स्टेडियम उभारण्यात आलं आहे. शाळेचे संस्थापक दीपक पायगुडे यांनी स्टेडियमच्या व्यवस्थितसाठी सहकार्य केले आहे.
कुस्ती प्रेंमीसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची (Pune Maharashtra Kesari 2023) घोषणा करण्यात आली आहे. पुण्यातील (Pune) फुलगाव (Fulgaon) मध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार रंगणार आहे. 7 ते 10 नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा ठेवण्यात आली… pic.twitter.com/TYNARkYYvr
— Civicmirrorofficial (@civicmirrorpune) November 4, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)