राज्य सरकारने राज्य कर कमी करून इंधनाचे दर कमी केले आहेत. राज्य सरकारने पेट्रोलचे दर ₹5 आणि डिझेलचे दर ₹3 रुपयांनी कमी केले. राज्य सरकार 6000 कोटींचा भार उचलणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे 5 रुपये आणि 3 रुपये प्रति लिटरने घट झाली आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. नवे दर आज 12 रात्रीपासून लागू होतील.
महाराष्ट्रातील आजच्या पेट्रोल किंमती - 14th July 2022
The price of petrol & diesel reduced by Rs 5 per litre & Rs 3 per litre respectively: Maharashtra CM Eknath Shinde pic.twitter.com/7f0EvMrUQI
— ANI (@ANI) July 14, 2022
मुख्यमंत्र्यांचे ट्विट
मंत्रिमंडळ बैठक निर्णय
गुरूवार दि. १४ जुलै २०२२ रोजीच्या बैठकीतील निर्णय संक्षिप्त स्वरूपात:
- पेट्रोलवर ५ रुपये आणि डिझेलवर ३ रुपये प्रति लिटर दर कमी करण्याचा निर्णय.
( वित्त विभाग)
- राज्यात "स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अभियान" राबविण्यात येणार.
(नगर विकास विभाग)
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 14, 2022
१४ जुलै २०२२..२/२@MahaDGIPR @ddsahyadrinews pic.twitter.com/iLrW0jRhB3
— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) July 14, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)