17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर हा कालावधी आम्ही सेवा पंधरवडा म्हणून साजरा करणार आहोत. 17 सप्टेंबर हा पंतप्रधान मोदी यांचा जन्मदिवस असतो. आपला वाढदिवस साजरा करु नये त्या ऐवजी सेवा सप्ताह साजरा करावा अशी त्यांची इच्छा असते. त्यामुळे 17 सप्टंबर हा पंतप्रधानांचा वाढदिवस तर 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांची जयंती असते. त्यामुळे या काळात राष्ट्रनेता ते राष्ट्रपीता या पंधरवड्यात सर्व प्रकारच्या सेवा लोकांना देण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान @narendramodi यांच्या १७ सप्टेंबरचा वाढदिवस लक्षात घेऊन १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राष्ट्रनेता से राष्ट्रपिता हा सेवा पंधरवडा राबवणार- उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis @Devendra_Office @DDNewslive @DDNewsHindi pic.twitter.com/F4dUYymOpM
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) September 12, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)