महाराष्ट्रातील ठाणे येथे एक मॉडेल आणि सोशल मिडिया स्टार प्रिया सिंगने तिचा कथित प्रियकर आणि एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मुलावर तिला रेंज रोव्हर कारने चिरडून मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. अश्वजीत गायकवाड असे या प्रियकराचे नाव आहे. आता याप्रकरणी एसआयटीने मोठी कारवाई केली आहे. ठाणे पोलिसांच्या एसआयटीने मुख्य आरोपी अश्वजित गायकवाड आणि त्याचे दोन साथीदार रोमिल पाटील आणि सागर शेडगे यांना अटक केली. गुन्ह्यात वापरलेले वाहनही जप्त करण्यात आले आहे. ठाणे पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. कासारवडवली पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात, अश्वजित गायकवाड, रोमिल पाटील आणि सागर शेडगे यांना अटक करण्यात आल्याचे ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजित सिंह यांनी सांगितले. त्यांच्याकडून पोलिसांनी एक स्कॉर्पिओ आणि लँड रोव्हर डिफेंडर कार जप्त केली आहे. (हेही वाचा:  'मला न्याय हवाय... !' ठाण्यात बड्या अधिकाऱ्याच्या मुलाचा प्रेयसीला SUV ने चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न; पिडीतेने सोशल मिडियावर कथन केली घटना)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)