अभिनेता सुमित राघवनने (Summet Raghavan) त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो व्हिडीओ फ्रान्समधील आहे. या व्हिडीओत रस्त्यावर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना थेट रस्त्यावर ओढत लोळवत नेत बाजूला केलं जात आहे. तरी सुमित राघवनने हा व्हिडीओ शेअर करत म्हणाला आहे की आरे आंदोलकांसोबत पण हेच व्हायला हवं. डोक्यावर बसले आहेत हे बोगस फालतु लोक. तरी सुमित राघवनच्या वादग्रस्त ट्विटमुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आरे जंगतोड विरोधाला विविध राजकीय पक्षांचा पाठींबा आहेत. तरी सुमितच्या या वादग्रस्त ट्विटचे राज्याच्या राजकारणात काय पडसाद उमटणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)