वृद्धापकाळाने लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण (Sulochana Chavan) आज काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. मागील 60 वर्ष आपल्या कलेने रसिकांची सेवा करणार्या या प्रतिभासंंपन्न कलाकाराच्या निधनाचं वृत्त समजताच एनसीपी अध्यक्ष शरद पवार, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्ष नेते अजित पवार, खासदार अमोल कोल्हे यांनी आपला शोक संदेश ट्वीटरच्या माध्यमातून शेअर केला आहे. क्की वाचा: ..आणि सुलोचना चव्हाण यांना अवघा महाराष्ट्र 'लावणीसम्राज्ञी' म्हणू लागला .
शरद पवार
ज्येष्ठ पार्श्वगायिका लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. बुलंद आवाज व ठसकेबाज शैलीने त्यांनी लावणीला एका वेगळ्या उंचीवर नेले. ६० वर्षांहून अधिक काळ त्यांनी आपल्या गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. #सुलोचनाचव्हाण pic.twitter.com/BSL578e6WO
— Sharad Pawar (@PawarSpeaks) December 10, 2022
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आपल्या खर्जातल्या आवाजाच्या जादूने अनेक लावण्या ठसकेबाज करणाऱ्या महाराष्ट्राच्या ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी, पद्मश्री सुलोचना चव्हाण यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतीव दुःख झाले. त्यांच्या निधनाने स्वरांच्या आकाशगंगेतील एक तारा निखळला आहे.परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 10, 2022
विरोधी पक्षनेते अजित पवार
ज्येष्ठ पार्श्वगायिका, लावणीसम्राज्ञी सुलोचनाताई चव्हाण यांचं निधन हे महाराष्ट्राच्या कला, सांस्कृतिक विश्वासाठी धक्का आहे. त्यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या लोककला, लोकसंगीतातील देदिप्यमान युगाचा अंत झाला आहे. सुलोचनाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/QQNpdEYijh
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) December 10, 2022
अमोल कोल्हे
महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच आई-जगदंबेचरणी प्रार्थना! pic.twitter.com/VNFSMqAQSO
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) December 10, 2022
जितेंद्र आव्हाड
गेल्या ६० वर्षांहूनही अधिक काळ रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या महाराष्ट्राच्या लावणी सम्राज्ञी ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांचं आज दुःखद निधन झालं
त्यांनी गायलेल्या लावण्या...निव्वळ अप्रतिम त्यामुळेच त्या लावणी सम्राज्ञी ठरल्या
भावपूर्ण श्रद्धांजली
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 10, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)