बीबीसीच्या 'इंडिया: द मोदी क्वेश्चन’ या वादग्रस्त माहितीपटाबाबतचा वाद दिवसेंदिवस वाढत आहे. हैदराबाद विद्यापीठात ही डॉक्युमेंटरी दाखवण्यात आली.  त्यानंतर जेएनयू आणि जामियामध्ये स्क्रिनिंगवरून गोंधळ झाला आणि आता दिल्ली विद्यापीठात बीबीसीची ही डॉक्युमेंटरी दाखविण्याची घोषणा करण्यात आली आहे. आता मुंबईच्या टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत ही डॉक्युमेंटरी दाखवण्याबाबत चर्चा सुरु आहे.

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) ने शुक्रवारी सांगितले की, काही विद्यार्थी बीबीसी डॉक्युमेंटरी दाखवण्याची योजना आखत आहेत. संस्थेने त्याच्या स्क्रीनिंगला परवानगी दिलेली नाही. यामुळे कॅम्पसमधील शांतता धोक्यात येऊ शकते. संस्थेच्या नियमांच्या विरोधात कोणतेही कृत्य केल्यास कठोर कारवाई केली जाईल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)