वर्सोवा वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्रवीर सावरकर तर एमटीएचएलला अटलबिहारी वाजपेयी स्मृती आणि शिवडी नाव्हा शेवा अटल सेतू असं नाव दिलं जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज पार पडलेल्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना राज्यात 700 ठिकाणी सुरु करण्याचाही निर्णय याच बैठकीत घेण्यात आला. या दवाखान्यांनासाठी सुमारे 210 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत, भामा आसखेड प्रकल्पाचे कालवे रद्द करणेबाबत निर्णय घेण्यात आला. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजना एकत्रित केल्या जाणार असल्याचाही निर्णय झाला. शिवाय संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतील निवृत्तीवेतनात भरीव वाढ आणि इतरही काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)