Sindhudurg-Hyderabad Flight: अलायन्स एअर 1 फेब्रुवारीपासून सुरु करणार सिंधुदुर्ग-हैदराबाद विमानसेवा

1 फेब्रुवारीपासून अलायन्स एअर या कंपनीतर्फे हैद्राबाद म्हैसूर- सिंधुदुर्ग- म्हैसूर-हैद्राबाद या दुसऱ्या विमानसेवेचा प्रारंभ करण्यात येत आहे.

Sindhudurg-Hyderabad Flight: अलायन्स एअर 1 फेब्रुवारीपासून सुरु करणार  सिंधुदुर्ग-हैदराबाद विमानसेवा
Representational Image (Photo Credits: Pixabay, Lars_Nissen_Photoart)

महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या कोकण भागातील सिंधुदुर्ग या पर्यटन स्थळाला 1 फेब्रुवारीपासून हैदराबाद आणि म्हैसूरला जोडणारे दुसरे अलायन्स एअर फ्लाइट मिळणार आहे. एका अधिकाऱ्याने सोमवारी याबाबत माहिती दिली. 1 फेब्रुवारीपासून अलायन्स एअर या कंपनीतर्फे हैद्राबाद म्हैसूर- सिंधुदुर्ग- म्हैसूर-हैद्राबाद या दुसऱ्या विमानसेवेचा प्रारंभ करण्यात येत आहे. विमानतळाच्या ऑपरेटरने सोमवारी सांगितले की, अलायन्स एअर हैदराबाद ते म्हैसूर मार्गे  सिंधुदुर्ग अशी विमानसेवा आठवड्यातून दोनदा चालवेल. 9 ऑक्टोबर 2021 पासून विमानतळाचे व्यावसायिक कामकाज सुरू झाले होते.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 30, 2023 09:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).