सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 19 जागांसाठी शेवटच्या दिवशी एकूण 91 अर्ज दाखल झाले आहेत. येत्या सोमवारी या अर्जांची छाननी होणार असून 21 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक मुदत मे 2020 मध्ये संपली आहे; मात्र कोरोनामुळे सहकार विभागाने मुदतवाढ देत निवडणूक पुढे ढकलली होती. सध्या या बँकेवर त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत निवडून आलेल्या संचालकांची सत्ता आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)