महाराष्ट्रात धुळे-सीएसएमटी एक्स्प्रेस ट्रेनमध्ये गोमांस बाळगल्याच्या संशयावरून एका वृद्ध प्रवाशाला मारहाण केल्याची घटना समोर आली होती. आता याप्रकरणी धुळ्यात शनिवारी आरोपींना पकडण्यात आले. या घटनेचा एक एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. अहवालानुसार, अश्रफ हुसेन (72) हे आपल्या मुलीला भेटण्यासाठी जळगावहून कल्याणला जात होते. प्रवासादरम्यान त्यांचा इतर सहप्रवाशांशी सीटवरून वाद झाला. त्यावेळी गोमांस बाळगल्याचा आरोप करत इगतपुरीजवळ त्यांना ट्रेनमध्ये शिवीगाळ आणि मारहाण केली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जीआरपीने या वृद्धाचा शोध घेतला. रेल्वे पोलीस आयुक्तांनी या घटनेची पुष्टी केली आणि या प्रकरणी एफआयआर नोंदवून मारहाण करणाऱ्या प्रवाशांना ताब्यात घेतले. तक्रारदाराच्या जबाबाच्या आधारे, ठाणे जीआरपी पोलिसांनी 5 हून अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेतील संशयित आरोपींना धुळ्यातून ताब्यात घेण्यात आले होते, त्यानंतर त्यांना ठाण्यात आणण्यासाठी पथक रवाना करण्यात आले आहे. दुसरीकडे या घटनेनंतर अश्रफ यांनी आत्महत्या केल्याची बातमी समोर आली होती. मात्र ती खोटी असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. रेल्वे पोलिसांनी जनतेला आवाहन केले आहे की, त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि व्हिडीओ शेअर करणे टाळावे. अश्रफ हे सुखरूप असून सध्या ते कल्याण येथे त्यांच्या मुलीच्या घरी आहेत. (हेही वाचा: Haryana Mob Lynching: हरियाणात गोमांस खाल्ल्याच्या संशयावरून गोरक्षकांनी तरुणाला केली बेदम मारहाण; व्यक्तीचा मृत्यू, 5 जणांना अटक)
गोमांस बाळगल्याच्या संशयावरून वृद्धाला मारहाण-
हम सिर्फ मूकदर्शक नहीं बने रह सकते। अब समय आ गया है कि हम, सभी धर्मनिरपेक्ष भारतीयों को इन ताकतों को हराने के लिए एक साथ आना चाहिए। इन लोगों के बीच कितना ज़हर फैल गया है और वे किसी ऐसे व्यक्ति के साथ ऐसा करने के बारे में कैसे सोच सकते हैं जो शायद उनके दादा की उम्र का है। बहुत हो… pic.twitter.com/VVRCMothto
— Imtiaz Jaleel (@imtiaz_jaleel) August 31, 2024
On the instruction of Maharashtra president @imtiaz_jaleel sahab our jalgaon party X president @rayyanjahagirda is present with victim at kalyan .Imtiaz jaleel sahab spoken to officials of the railway police in Thane to register FIR and take stringent action against the culprits https://t.co/6tH3HGksgu pic.twitter.com/JNRJaldvD0
— sanir sayyed (@SanirSayyed) August 31, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)