नाशिक पुणे महामार्गावर चालत्या शिवनेरी बसला आग लागल्याची अजून एक घटना समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर जवळील माळवाडी येथील ही घटना आहे. कंडक्टरने प्रसंगावधान दाखवत सार्यांना सुरखरूप बाहेर काढले. काल पुण्यात येरवडा परिसरात एका शिवशाहीला आग लागल्याचं वृत्त ताजं असतानाच आता अजून एक घटना समोर आली आहे. दरम्यान कालच अमरावती मध्येही एका एसटी बसने पेट घेतला होता.
शिवशाहीला आग
नाशिकहून पुण्याला जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या #शिवशाही बसला आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास नाशिक जिल्ह्यातील सिन्नर जवळील माळवाडी इथं #आग लागली. चालकाने बस मधून धूर निघाल्याचे बघून बस थांबवताच प्रवासी तातडीने बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टाळली.@InfoNashik pic.twitter.com/iU6QwkozHr
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) November 2, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)