Shivbhojan Thali: महाराष्ट्र शासनाने 2020 मध्ये शिवभोजन थाळी योजना सुरु केली. याद्वारे गरीब, वंचित आणि कष्टकरी लोकांना अत्यंत कमी दरात पोटभर जेवण देण्यात येत आहे. या योजनेच्या अंतर्गत भोजनालय चालविण्यासाठी, सध्याच्या स्थितीत सुरु असलेल्या खानावळ, भोजनालय, एनजीओ, महिला बचत गट, रेस्टॉरंट किंवा मेस यांची समितीव्दारे निवड करण्यात येते. आता राज्यात पहिल्यांदाच तृतीयपंथीयांना शिवभोजन थाळी केंद्र सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणून त्यांची आर्थिक प्रगती आणि उदरनिर्वाहासाठी महाराष्ट्रात प्रथमच शिवभोजन थाळी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. नागपूर येथे तृतीयपंथीयांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लाभाचे वाटप करुन आश्वस्त केले. यात प्रामुख्याने तृतीयपंथीयांसाठी शिवभोजन थाळी केंद्र सुरु करण्यास मान्यता देऊन तसे प्रमाणपत्र त्यांना बहाल केले. किन्नर विकास बहुउद्देशिय सामाजिक संस्था आता नागपूर येथून सामाजिक न्यायाचा नवा आयाम सुरु करीत आहे. (हेही वाचा: Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेचे मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत; राज्य सरकारचे स्पष्टीकरण)
पहा पोस्ट-
तृतीय पंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोठा निर्णय नागपूर मधील तृतीयपंथीयांना शिवभोजन थाळी केंद्र मंजूर तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणि उदरनिर्वाहा आणूनसाठी निर्णय
महाराष्ट्रात प्रथमच शिवभोजन थाळी केंद्र सुरू करण्यास मान्यता
.
.#nagpur #shivbhojanthalicentrenagpur… pic.twitter.com/YxVAWvPrC2
— MumbaiiOutlook (@MumbaiiOutlook) August 2, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)