शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना तसेच नाशिक संपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख संजय राऊत यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. संजय राऊत यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली. दरम्यान, भाऊ चौधरी हे आज शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे समजते. एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनीही आपल्या ट्विटमध्ये अप्रत्यक्ष रित्या उल्लेख करत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यामुळे या चर्चेला पुष्टी मिळत आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)