रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी 'एसआयटी'मार्फत तपास सुरु असून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. ते लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सभागृहात बोलत होते. शशिकांत वारिशे हे रत्नागिरीतील अत्यंत धडाडीचे पत्रकार म्हणून ओळखले जात. काहीच दिवसांपूर्वी त्यांचा अत्यंत संशयास्पदरित्या अपघाती मृत्यू झाला. त्यावरुन राज्यभर चर्चा सुरु होती.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)