Sharad Pawar On Legislative Assembly’s Privilege Committee: तक्रारदारच न्यायाधीश म्हणून नियुक्त केले तर न्यायाची अपेक्षा कशी करता येईल? नव्या हक्कभंग समिती वरून शरद पवारांनी उपस्थित केला सवाल
हक्कभंग समितीतील सदस्य नि:पक्षपाती, ज्येष्ठ असावेत याबाबत आवश्यक काळजी घ्यायला हवी होती. अशी अपेक्षा शरद पवारांनी व्यक्त केली आहे.
राहुल कूल यांच्या अध्यक्षपदाखाली काल 15 जणांची नवी हक्कभंग समिती काल विधानसभा अध्यक्षांनी स्थापन केली आहे. यामधील सदस्यच जर संजय राऊतांवर हक्कभंगांची मागणी करणारे असतील तर त्याच्या नि:पक्षपाती पणावर प्रश्नचिन्ह उभा राहत आहे. दरम्यान संजय राऊत यांनी केलेले विधान विधिमंडळाबाबत होते की विशिष्ट गटाबद्दल होते याचा त्यांनी केलेल्या विधानाचा एकत्रितरित्या विचार व्हावा याकरता हक्कभंग समितीतील सदस्य नि:पक्षपाती, ज्येष्ठ असावेत याबाबत आवश्यक काळजी घ्यायला हवी होती. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
पहा ट्वीट
श्री. संजय राऊत यांनी केलेले विधान विधिमंडळाबाबत होते की विशिष्ट गटाबद्दल होते याचा त्यांनी केलेल्या विधानाचा एकत्रितरित्या विचार व्हावा याकरता हक्कभंग समितीतील सदस्य नि:पक्षपाती, ज्येष्ठ असावेत याबाबत आवश्यक काळजी घ्यायला हवी होती.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 2, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 02, 2023 02:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

