शरद पवार यांचा आज 85 वा वाढदिवस आहे. सध्या संसदेचं अधिवेशन सुरू असल्याने शरद पवार दिल्लीमध्ये आहेत. तर काल दिल्लीत पोहचलेल्या अजित पवार यांनी आज सकाळी शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यांच्यासोबत अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार, नेते छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल  पटेल देखील आहेत. दरम्यान आज सकाळी शरद पवारांनी कार्यकर्त्यांची भेट घेत वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारल्या. Sharad Pawar 85th Birthday: शरद पवार यांना Currency Note Press Nashik कडून खास गिफ्ट (Watch Video). 

अजित पवार शरद पवारांच्या 85 व्या बर्थ  डे निमित्त भेटीला 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)