कन्याकुमारी ते कश्मीर या राहुल गांधींच्या पहिल्या टप्प्यातील पदयात्रेला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर आता गुजरात ते मेघालय असा दुसरा टप्पा आयोजित करण्यात आला आहे. नाना पटोले यांनी त्याबाबतची माहिती दिल्यानंतर आता त्याचवेळेस महाराष्ट्रातील कॉंग्रेस नेते पदयात्रा करणार आहेत. त्यात मुंबई मध्ये वर्षा गायकवाड नेतृत्त्व करणार आहेत,  नाना पटोलो पूर्व विदर्भात असतील, पश्चिम विदर्भात विजय वडेट्टीवार करणार आहेत, उत्तर महाराष्ट्रात बाळासाहेब थोरात नेतृत्त्व करतील तर मराठवाड्यात अशोक चव्हाण आणि पश्चिम महाराष्ट्रात पृथ्वीराज चव्हाण पदयात्रा  करणार आहेत. नंतर सारे नेते कोकणात जाणार आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)