Accident Video: वसईच्या नायगाव परिसरात स्कूल बसने दोन सख्ख्या बहिणींना चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी १ मार्च रोजी घडली. अंगाला काटा आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या दुर्घटनेत दोन्ही मुलींना गंभीर दुखापत झाली आहे. दोघींवर रुग्णालयात उचारासाठी नेण्यात आले आहे. ही घटना जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, दोन बहिणी एकमेकांचा हात पकडून रस्ता ओलांडत होत्या.दरम्यान समोरून येणाऱ्या स्कूल बसने दोघींना चिरडले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)