मुंबई मध्ये प्रभादेवी भागात सिद्धिविनायक मंदिराजवळ रस्तामध्ये मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यामध्ये एक कार देखील अडकल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत हा मार्ग वाहतूकीसाठी थोडा मर्यादित केला आहे. त्यामुळे प्रभादेवी भागात वाहतूक मंदावली आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ अनेकांनी सोशल मीडीयामध्येही शेअर केला आहे.
प्रभादेवी भागात सिद्धिविनायक मंदिराजवळ रस्तामध्ये मोठा खड्डा
A sinkhole has appeared right in the middle of the Prabhadevi Junction! 😱 ⚠️
Media and police already there.
@RoadsOfMumbai pic.twitter.com/IgJ9uwV5xW
— Karthik Nadar (@runkarthikrun) September 12, 2024
प्रभादेवी सिग्नल जवळचा रस्ता अचानक खचला; गाडीचे चाक खड्ड्यात अडकल्याने ट्राफिक जाम #Prabhadevi #viralvideo pic.twitter.com/jogVAN1CUS
— Saamana (@SaamanaOnline) September 12, 2024
मुंबई ट्राफिक विभागाची माहिती
Traffic Movement Is Slow At Swatantryaveer Savarkar Marg Prabhadevi Due to Big Pothole.
मोठा खड्डा पडल्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग प्रभादेवी कडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे. #MTPTtrafficUpdates
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) September 12, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)