अभिनेत्री माधुरी दीक्षित पती श्रीराम नेने यांच्यासोबत मराठी सिनेमा निर्मिती क्षेत्रामध्ये उतरली आहे. त्यांचा आगामी 'पंचक' सिनेमा येत्या 5 जानेवारीला रीलिज होणार आहे. या सिनेमाच्या यशासाठी आज माधुरी पती श्रीराम यांच्यासोबत प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरा मध्ये बाप्पाच्या दर्शनाला पोहचली होती. त्यांनी प्रेक्षकांना माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने प्रस्तुत हा 'पंचक' सिनेमागृहात जाऊन पाहण्याचं आवाहन केले आहे. Panchak Marathi Film: माधुरी दीक्षितच्या 'पंचक' मराठी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित! 

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)