राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार रजनीताई पाटील यांनी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आज विधिमंडळात जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. महाविकास आघाडीकडे पूर्ण बहुमत असल्याने रजनीताई पाटील या बहुमताने निवडून येतील, असा विश्वास मविआच्या नेत्यांनी व्यक्त केला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सार्वजनिक मंत्री अशोक चव्हाण, उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार, मंत्री गुलाबराव पाटील, कृषी मंत्री दादाजी भुसे आदी उपस्थित होते.
#congress #RajyaSabha election candidate #RajniPatil while filling her nomination. @mieknathshinde @bb_thorat @AjitPawarSpeaks were present pic.twitter.com/loeqdOWv0d
— Abdulkadir/ अब्दुलकादिर (@KadirBhaidc) September 22, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)