One Nation, One Election: केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी देशात लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका, म्हणजेच एक देश एक निवडणूक घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. हे विधेयक हिवाळी अधिवेशनात म्हणजेच नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये संसदेत मांडले जाईल. याआधी 17 सप्टेंबर रोजी गृहमंत्री अमित शहा म्हणाले होते की, सरकार या कार्यकाळात 'वन नेशन वन इलेक्शन' लागू करेल. 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान म्हणाले होते की, वारंवार होणाऱ्या निवडणुका देशाच्या प्रगतीत अडथळा आणत आहेत. आता सरकारच्या या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले विचार मांडले आहेत. राज ठाकरे म्हणाले, ‘ही फक्त केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता आहे आणि अजून याला संसदेची मान्यता लागेल. आणि अर्थात देशातील प्रत्येक राज्याचा कौल पण विचारात घ्यावाच लागेल. आणि कौलचा अर्थ वरवरची मान्यता नाही तर अशा प्रकारांनी राज्यांच्या अधिकारांना, स्वायत्ततेला धक्का पोहचणार नाही, याची खातरजमा पण व्हायलाच हवी.’

ते पुढे म्हणतात, ‘पण 'एक देश एक निवडणूक' हे सर्व ठीक आहे, आधी राज्यातल्या महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका घ्या. निवडणुकांचं महत्व इतकंच वाटतंय तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्या.’ (हेही वाचा: One Nation One Election: वन नेशन वन इलेक्शन प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजूर केले)

'एक देश एक निवडणूक' संकल्पनेबाबत राज ठाकरेंचा सरकारला टोला-

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)