रायगड पोलिसांनी खोपोली येथील 'आंचल केमिकल' या फार्मास्युटिकल कंपनीवर पोलिसांनी छापा टाकला. ज्यामध्ये तब्बल 07 कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. तसेच, तीन ड्रग्ज तस्करांनाही या वेळी अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडे चौकशी केली असता कंपनीमध्ये आणखीही काही ठिकामी ड्रग्ज लपवण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी संशयीत गोदामावर छापा टाकून कारवाई केली असता मोठ्या प्रमाणावर एमडी ड्रग्ज आढळून आले. ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत 218 कोटी रुपये असून वजन जवळपास 174 किलो आहे दोन्ही कारवाईत आतापर्यंत 325 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त झाल्याची माहिती कोकण परिक्षेत्राचे आयजी प्रवीण पवार यांनी दिली आहे.

एक्स पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)