Pune Weather Prediction, July 2: पुणे आणि लगतच्या भागामध्ये पावसाचा जोर वाढू शकतो, असा अंदाज भारतीय हवामान विभाग म्हणजेच आयएमडीने वर्तवला आहे. आयएमडीने हवामानाचा अंदाज वर्तवताना म्हटले आहे की, विवार आणि सोमवार पुण्यात अलर्ट जारी केला आहे. IMD ने पुन्यात मुसळधार पावसाची शक्यात आहे. अरबी समुद्रात मान्सून सक्रिय होत असून पुढील दोन दिवस महत्त्वाचे असल्याची माहिती आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि सातारा सध्या ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या प्रदेशांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस अपेक्षित आहे, विशेषत: घाट भागात.पुणे जिल्ह्यातील घाट भागात पावसाचा जोर लक्षणीय वाढला आहे .
पुण्यात आज 1 जुलै 2024 रोजी तापमान 24.36 डिग्री सेल्सियस आहे. दिवसाचा अंदाज किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 23.62 °C आणि 25.86 °C दर्शवतो.घाट परिसरात पुढील ४८ तास पावसाचा जोर कायम राहील आणि त्यामुळे लोकांना प्रवास करताना सुरक्षा नियमांचा पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे, असे IMD अधिकाऱ्यांनी सांगितले आहेत.पुणे सोबतच रत्नागिरी आणि रायगडमध्ये सुद्धा हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.आता पुण्यात उद्याचे हवामान कसे असेल ह्यासाठी हवामान विभागने पुण्याचे उद्याचे हवामान अंदाज लावला आहे. हेही वाचा: Kokan Weather Forecast For Tomorrow: कोकणात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!
गेल्या २४ तासांत विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची नोंद झाली, तर कोकण आणि घाटात मुसळधार पाऊस झाला. IMD नुसार, या प्रदेशांमध्ये 3 जुलैपर्यंत जोरदार ते मध्यम पाऊस पडत राहील.आज पालघर वगळता कोकणात सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्रातील बहुतांशी भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता अधिक असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 'एल निनो' स्थिती सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तटस्थ राहू शकते. तर पावसाळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच जुलै किंवा ऑगस्टमध्ये 'ला निना' स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ला निना स्थिती देशातील यंदाच्या मॉन्सून साठी पोषक असल्याच्या नोंदी आहेत, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)