Kokan Weather Forecast For Tomorrow: कोकणात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!

कोकणात आज मुसळधार पाऊसचा इशारा आहे. राज्यात येणाऱ्या काही दिवसात पावसाचा जोर वाडणार आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र आहे.

Kokan Weather Forecast For Tomorrow: कोकणात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!
Image Credit : Pixabay

Kokan Weather Prediction, July 1 : कोकणात आज मुसळधार पाऊसचा इशारा आहे. राज्यात येणाऱ्या काही दिवसात पावसाचा जोर वाडणार आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्यामुळे 30 जून ते 3 जुलैपर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. व कोकणात यल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुढील पाच दिवस कोकण किनारपट्टी भागात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे सर्वच नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर मुंबईसह ठाण्यात देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. येत्या 24 तासात राज्याच्या बहुतांश भागात पावसाची शक्यता असून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज  हवामान विभागाने वर्तवला आहे. यादरम्यान, ताशी 40-50 किमी वेगानं वारे वाहण्याचा इशारा हवामान विभागानं देत नागरिकांना सतर्क केलं आहे. हवामान विभागाने कोकण किनारपट्टीला वादळी पावसाचा इशारा दिला आहे. आता कोकणात उद्याचे हवामान कसे असतील ह्यासाठी हवामान विभागने कोकण चे उद्याचे हवामान अंदाज लावला आहे. हेही वाचा: Pune Weather Forecast For Tomorrow: पुण्यात उद्याचे हवामान कसे? पहा हवामान अंदाज!

कोकण उद्याचे हवामान कसे? 

गेल्या २४ तासांत विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची नोंद झाली, तर कोकण आणि घाटात मुसळधार पाऊस झाला. IMD नुसार, या प्रदेशांमध्ये 3 जुलैपर्यंत जोरदार ते मध्यम पाऊस पडत राहील.आज पालघर वगळता कोकणात सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असून या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलाय. हवामान विभागाच्या अंदाजपत्रानुसार यंदा देशात सरासरीच्या 106 टक्के पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आहे. तसेच महाराष्ट्रातील बहुतांशी भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता अधिक असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 'एल निनो' स्थिती सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तटस्थ राहू शकते. तर पावसाळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच जुलै किंवा ऑगस्टमध्ये 'ला निना' स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ला निना स्थिती देशातील यंदाच्या मॉन्सून साठी  पोषक असल्याच्या नोंदी आहेत, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे

(The above story first appeared on LatestLY on Jun 30, 2024 04:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).