Pune Porsche Car Crash: पुणे शहरातील पोर्शे हिट अँड रन प्रकरणात मृत्यूमुखी पडलेला तरुण आणि तरुणीच्या पालकांना राज्य शासनाकडून विशेष बाब म्हणून देण्यात आलेल्या 10 लाखांचा धनादेश आज त्यांना सुपूर्द करण्यात आला. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला आज कोर्टाने जामीन मंजूर केला असला तरीही, या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करू असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पालकांना आश्वस्त केले.
अल्पवयीन मुलाला निरीक्षण गृहात बेकायदेशीरपणे ठेवले जात असल्याचा आरोप करत त्याच्या आत्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणावर आज सुनावली पार पडली. या प्रकरणी सुनावणीदरम्यान न्यायालयाने अनेक महत्त्वपूर्ण टिपण्णी केली होती. तसेच जो अपघात झाला तो संवेदनशील असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. मात्र याचा परिणाम अल्पवयीन आरोपीवरही झाला आहे. मानसशास्त्रज्ञांसोबत अल्पवयीन मुलांचे सत्र सुरू ठेवावे, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. (हेही वाचा: NEET Paper Leak Case: लातूर येथील शिक्षकास 6 दिवसांची पोलीस कोठडी, नीट परीक्षा पेपर लीक प्रकरण)
पहा पोस्ट-
#WATCH | Maharahstra CM Eknath Shinde assured the Pune Porsche car victims' family that though HC has given bail to the accused, the government will ensure justice for them in this matter: CMO
CM also gave a cheque of Rs 10 lakhs to the victim's family
(Source: CMO office) pic.twitter.com/BHtbYXp3UW
— ANI (@ANI) June 25, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)