पाठिमागील काही दिवसांपासून कांद्याचे भाव सातत्याने पडत आहे. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्राला विनंती केली आहे. एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्री पियूश गोयल यांना म्हटले आहे की, कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे नाफेडमार्फत आणखी २ लाख मेट्रीक टन कांद्याची खरेदी किंमत स्थिरीकरण निधी (Price Stabilization Fund) द्वारे करावी.
ट्विट
कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे नाफेडमार्फत आणखी २ लाख मेट्रीक टन कांद्याची खरेदी किंमत स्थिरीकरण निधी (Price Stabilization Fund) द्वारेकरावी अशी विनंती मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी केंद्रीय मंत्री @PiyushGoyal यांना पत्राद्वारे केली.
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) September 15, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)