Ashish Shelar On Aaditya Thackeray: शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांची कोस्टल रोड प्रकरणात (Coastal Road Case) चौकशी करा अशी मागणी मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केली आहे. आशिष शेलार यांनी अधिवेशनापूर्वी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. ठाकरे सरकारच्या कार्यकाळात कोस्टल रोडला लागून असलेला मोकळा भूखंड बिल्डरांना देण्यात आल्याचे शेलार यांनी म्हटलं आहे. पत्रकारांशी बोलताना आशिष शेलार म्हणाले की, 'कोस्टल रोडच्या घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन उद्धव ठाकरे सरकारच्या काळात पर्यावरण मंत्री असलेले आदित्य ठाकरे यांची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. याचं कारण केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं किनारपट्टीच्या रस्त्यांच्या मंजुरी मिळवताना घातलेल्या अटींमध्ये समुद्राच्या पाण्यामुळं निर्माण झालेल्या मोकळ्या जागांचं व्यापारीकरण होऊ नये, अशी अट घातली होती. मात्र, केंद्र सरकारला विनंती करूनही जागा रिक्त राहतील, असं प्रतिज्ञापत्र तत्कालीन सरकारनं केंद्र सरकारला दिलं नव्हतं, असंही शेलार यांनी यावेळी नमूद केलं.
मुंबईकरांना मुंबईत रिकाम्या जागा मिळू शकत नाहीत. मात्र, मुख्यमंत्री शिंदे तसंच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्षमतेमुळे मुंबईत जवळपास तीनशे एकर मोकळी जागा उपलब्ध झाली आहे, असंही यावेळी आशिष शेलार यांनी सांगितलं. (हेही वाचा - Mira-Bhayandar: मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर MBMC ने सुरु केली शहरातील बेकायदेशीर बार आणि लॉजबाबत बुलडोझिंग मोहीम)
BJP MLA Ashish Shelar Calls For Investigation Into Alleged Land Handovers During Thackeray Govthttps://t.co/N9rYg9gzwk#AshishShelar #AdityaThackeray #Mumbainews #Mahalaxmiracecourse #Thackeraygovt #Mumbai
— Free Press Journal (@fpjindia) June 27, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)