Mira-Bhayandar: संपूर्ण महाराष्ट्र अमली पदार्थमुक्त व्हावा असा महत्वाकांक्षी निर्णय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून, याबाबत ठोस कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनास दिले आहेत. या पार्श्वभूमीवर मीरा-भाईंदर महानगरपालिकेने (MBMC) अखेर शहरातील बार आणि लॉजचे बेकायदेशीरपणे बांधलेले भाग पाडण्यास सुरुवात केली. महापालिका उपायुक्त- रवी पवार यांच्या नेतृत्वाखालील एमबीएमसीच्या अतिक्रमण विरोधी पथकाने तब्बल सात बेकायदेशीरपणे बांधलेल्या आस्थापना उद्ध्वस्त केल्या.

गुरुवारी मोठ्या पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त करणाऱ्या पथकांनी बुलडोझिंग मोहिमेला सुरुवात केली. पुणे पोर्शेच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असलेल्या अमली पदार्थांच्या सेवनाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री-एकनाथ शिंदे यांनी महापालिका आणि पोलीस आयुक्तांना बेकायदेशीरपणे कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. संपूर्ण बेकायदेशीरता नष्ट होईपर्यंत मोहीम सुरूच राहील,‘ असे पवार म्हणाले. (हेही वाचा: Drugs Smuggling in Maharashtra: 'महाराष्ट्रात अमली पदार्थांची तस्करी वाढली, पानाच्या दुकानातही मिळतात ड्रग्ज'; राष्ट्रवादी-एससीपी नेते Jayant Patil यांचा दावा)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)