पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 10 फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणार आहेत. पीएमओने दिलेल्या माहितीनुसार, PM मोदी लखनौला भेट देतील जेथे ते उत्तर प्रदेश ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट 2023 चे उद्घाटन करतील. ते ग्लोबल ट्रेड शोचे उद्घाटन देखील करतील आणि Invest UP 2.0 लाँच करतील. त्यानंतर ते मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेन आणि मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत ट्रेन अशा दोन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील.
दरम्यान, मुंबई दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड आणि कुरार अंडरपास प्रकल्प ( Kurar underpass project) हे दोन रस्ते प्रकल्पही ते राष्ट्राला अर्पण करतील
PM will visit UP & Maharashtra on 10th Feb. At around 10 am, he'll visit Lucknow where he'll inaugurate UP Global Investors Summit 2023. At around 2:45 PM, he will flag off two Vande Bharat train at Chhatrapati Shivaji Maharaj Terminus, in Mumbai.
(File pic) pic.twitter.com/MHfRona8T1
— ANI (@ANI) February 8, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)