संसदेच्या हिवाळी अधिवेशनावर विरोधी पक्षांची राष्ट्रीय पातळीवरील आघाडी INDIA बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहे. इंडिया आघाडीतील घटक पक्षांची उद्या (19 डिसेंबर) एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे वृत्त वृत्तसंस्था एएनआयने सूत्रांच्या माध्यमातून दिले आहे.
विविध मुद्द्यांवरुन विरोधक केंद्र सरकारवर चर्चा करण्याची मागणी करत असताना सरकार मात्र, चर्चेऐवजी विरोधकांनाच नामोहरम करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी चक्क निलंबनाचे हत्यार वारंवरा उपसले जात आहे. आतापर्यंत जवळास चाळीसहून अधिक खासदारांचे विविध कारणांवरुन निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे विरोधक संतप्त असून ते बहिष्काराच्या भूमिकेपर्यंत आल्याचे समजते. (हेही वाचा, List of suspended MPs From LS: किती खासदार संसदेतून झाले निलंबीत? पाहा यादी)
एक्स पोस्ट
INDIA (opposition bloc) parties are likely to completely boycott the winter session of Parliament. The final decision will be taken in a meeting to be held tomorrow at the office of Leader of Opposition in Rajya Sabha: Sources
— ANI (@ANI) December 18, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)